Ad will apear here
Next
डॉ. शिकारपूर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार
डॉ. दीपक शिकारपूर
पुणे : संगणकतज्ज्ञ, लेखक डॉ. दीपक शिकारपूर यांना ‘रोटरी इंटरनॅशनल’तर्फे देण्यात येणारा मानाचा ‘सर्व्हिसेस अबाव्ह सेल्फ’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. समाजासाठी निरपेक्ष भावनेने झोकून देऊन काम करणाऱ्या व्यक्तीला ‘रोटरी’तर्फे जागतिक पातळीवरील हा पुरस्कार देण्यात येतो. १९९१पासून हा पुरस्कार देण्यात येत आहे. 

जगभरातील दोनशेपेक्षा अधिक देशांमधून या पुरस्कारासाठी अर्ज आले होते. अत्यंत कठीण निकष लावून त्यातून काही अर्ज निवडण्यात आले. त्यानंतर ‘रोटरी इंटरनॅशनल’च्या संचालक मंडळाने पुरस्कारार्थींची अंतिम यादी तयार केली. त्यामध्ये वर्ष २०१७-१८साठी पुण्यात डिजिटल साक्षरतेसाठी कार्य करणारे डॉ. दीपक शिकारपूर यांचे नाव निश्चित करण्यात आले. हा ‘रोटरी’तर्फे वैयक्तिक पातळीवर देण्यात येणारा सर्वांत मानाचा पुरस्कार असून, पुरस्कारार्थीला आंतरराष्ट्रीय प्रेसिडेंटनी स्वाक्षरी केलेले सन्मानपत्र देण्यात येते. 

डॉ. दीपक शिकारपूर हे संगणकतज्ज्ञ असून, १९९५पासून व्याख्याने, लेख, पुस्तके, व्हिडिओ, मोफत करिअर मार्गदर्शन अशा विविध माध्यमांतून डिजिटल साक्षरतेसाठी काम करत आहेत. माहिती-तंत्रज्ञानाचा वापर सर्वसामान्य माणसाला दैनंदिन जीवनात कसा करता येईल, याचे मार्गदर्शन करणारी, तसेच या क्षेत्रातील अभ्यासक्रम, नवनवीन शोध, संशोधने याबाबत ते सातत्याने सहजसोप्या पद्धतीने मार्गदर्शन करत असतात. या विषयाच्या संदर्भात त्यांनी तब्बल ३८ पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान शिक्षणाच्या प्रसाराकरिता कार्यरत असलेल्या ‘एआयसीटीई’च्या राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान मंडळाचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे.

डॉ. दीपक शिकारपूर यांची या आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानाच्या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सर्वच स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

(Please click here to read this news in English.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZSGBL
Similar Posts
‘एनेमटेक कॅपिटल’ची पुण्‍यातील ‘स्नॅपर’मध्‍ये गुंतवणूक पुणे : पुणेस्थित स्नॅपर फ्युचर टेक या कंपनीने अमेरिकास्थित एनेमटेक कॅपिटल इन्क. यांच्यासोबत भागीदारी करत असल्याची घोषणा पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत १७ मे २०१९ रोजी केली. ‘स्नॅपर’पासून भारतात ब्लॉकचेन क्रांतीला चालना देत आहे.
‘डिजिटल चतुर’चे डॉ. माशेलकरांच्या हस्ते प्रकाशन पुणे : ज्येष्ठ संगणकतज्ञ् डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘डिजिटल चतुर’ पुस्तकाचे प्रकाशन प्रख्यात शास्त्रज्ञ पदमविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे प्रमुख विशाल सोनी उपस्थित होते. गेल्या दशकात विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील सर्व आर्थिक, सामाजिक,
स्वादिष्ट वॅफल्सची दुनिया ... आता फर्ग्युसन रोडवर पुणे : ‘वॅफल्स’ हे मुळचे पाश्चात्त्य मिष्टान्न भारतीयांना अगदीच काही नवीन नाही, मात्र आता ते सहजपणे उपलब्ध होऊ लागले आहे. त्यामुळे खवैय्यांमध्ये ‘वॅफल्स’ची चलती दिसून येत आहे. पुणेकर खवैय्यांनाही ‘वॅफल्स’ने भुरळ घातली आहेच. अशा या अनोख्या ‘वॅफल्स’ची दुनियाच फर्ग्युसन रोडवर खुली झाली आहे. विशेष म्हणजे
‘सोलवूड व्हेंचर’च्या भव्य दालनाचा शुभारंभ पुणे : दर्जेदार सॉलिडवूडपासून बनलेल्या आकर्षक डिझाइन्सच्या फर्निचरचे ‘सोलवूड व्हेंचर’ हे भव्य पाच मजली दालन कोंढवा येथे सुरू झाले असून, नुकतेच याचे उद्घाटन अभिनेते सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांच्या हस्ते झाले. या वेळी पुणे महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, निवृत्त अप्पर वनरक्षक पांडुरंग मुंढे,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language